mukhprushth

मोफत गणवेश व पाठ्यपुस्तके

शाळा म्हटले की शिस्त आलीच! शाळेने विद्दार्थ्यांसाठी अतिशय चांगल्या प्रतीचा गणवेश निवडलेला आहे. प्रत्येक विद्दार्थ्यांसाठी नियमित शाळेच्या गणवेशामध्येच शाळेत यावे असा नियम आहे. आणि तो प्रत्येक विद्दार्थ्यास बंधनकारक आहे. त्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यास नियमितपणे शाळेच्या गणवेशामध्येच शाळेत पाठवावे अश्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मोफत गणवेश वाटप योजना :
Mafatlal School Uniform Fabric
             सर्व शिक्षण अभियान अंतर्गत शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थी तथा सर्व विद्यार्थिनींना प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस प्रत्येकी दोन संच मोफत गणवेश वाटप करण्यात येतो. सदर गणवेश अनुदान शालेय खात्यावर प्रती विद्यार्थी ४०० रु. या प्रमाणे प्राप्त झाल्यानंतर किंवा त्याआधी शालेय व्यवस्थापन समिती, वेढे अंतर्गत  सभेतील ठरावानुसार गणवेश कापड पुरवठादार  व शिलाईदार यांची निवड करण्यात येऊन दर्जेदार गणवेश वाटप केले जात असते परंतु सन २०१७-१८ या वर्षापासून सदर अनुदान "थेट अनुदान हस्तांतरण योजना" अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याच्या आधार संलग्नित वैयक्तिक खात्यावर वर्ग करण्यात येणार असून सदर अनुदान वर्ग करण्यापूर्वी विद्यार्थ्यास त्यांच्या पालकांनी गणवेश खरेदी करून दिले अथवा नाही याची शहानिशा व्हावी या उद्देशाने सदर गणवेश खरेदीची पावती शालेय कार्यालयात जमा करण्यात येणार असून सदर खरेदीची खात्री पटल्यावर तातडीने सदर रक्कम (प्रती विद्यार्थी ४०० रु.) वर्ग करण्यात येतात.





मोफत पाठ्यपुस्तके वाटप : 

          सर्व शिक्षण अभियान अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप शालेय व्यवस्थापन समिती, सदस्यांच्या हस्ते करण्यात येते.