mukhprushth

वाचन प्रेरणा दिन

वाचन प्रेरणा दिन व “जागतिक हात धुवा दिन” 

          जिल्हा परिषद शाळेत आपल्या सुचने प्रमाणे दि. १३/१०/२०१७ रोजी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम  यांच्या जयंती निमित्ताने वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. तसेच “जागतिक हात धुवा दिन” हि साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमप्रसंगी शालेय व्यव. समिती, वेढे चे अध्यक्ष श्री. विष्णू राबडे हे अध्यक्ष स्थानी होते तसेच समितीचे सदस्य हि उपस्थित होते.
प्रथमतः श्री. राबडे यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. श्री. कुलकर्णी यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक सादर केले व कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. श्री. सोनवणे सरांनी कलाम यांच्या जीवनाविषयी व कार्याविषयी माहिती सांगितली व जीवनात वाचनाचे महत्व विषद केले. तद्नंतर जागतिक हात धुवा दिनाचे औचित्य साधून सर्वासमक्ष श्री. सोनावणे यांनी हात धुण्याच्या पद्धतीचे प्रात्यक्षिक करून दाखविले व विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करवून घेतले. त्यानंतर खालील प्रमाणे उपक्रम राबविण्यात आले.


१) वाचनाचे महत्व  व्याख्यान
२) लेखकाविषयी माहिती
३) पुस्तकांविषयी मनोगत 
४) अग्रलेखाचे वाचन.
५) निवडक कथा, कविता अभिवाचन.
६) वाचन प्रेरणा दिन बोधचिन्हाचा प्रसार 
७) पुस्तके वाचन उपक्रम .