प्राथमिक शाळेत शिकणा–या मुलींना
उपस्थिती भत्ता
प्राथमिक शाळेत जाणाऱ्या
मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी इ. 1 ते 4 थी मधील शाळेत
जाणा-या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील सर्व मुली तसेच आदिवासी उपयोजन क्षेत्रा
व्यतिरिक्त राज्यातील अन्य भागातील अनुसुचित जमातीच्या मुलींना तसेच अनुसुचित जाती, भटक्या जमाती व विमुक्त जमातीत दारिद्रय रेषेखलील
विदयार्थींनींना प्रतिदिन प्रत्येक मुलींमागे 1 /- रुपया या दराने सदर मुलींच्या पालकांना उपस्थिती भत्ता दि. 3 जानेवारी 1992 या क्रांती ज्योती
सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी सुरु करण्यास शासनाने शिक्षण व सेवायोजन
विभागाच्या शासन निर्णय दि. 10 जानेवारी 1992 अ-वये अनुमती दिलेली आहे. त्यानुसार शिक्षण
विभाग ( प्राथमिक ) जिल्हा परिषद नागपुर अंतर्गत ही योजना राबविण्यात येते.
सदर योजनेचे अनुदान हे
पंचायत समिती, विक्रमगड कडून प्राप्त होत असुन शाळास्तरावरून प्रत्येक
लाभार्थ्याच्या खात्यावर वर्ग करण्यात येते.
- · दारिद्र्यरेषेखालील अ.जा., अ.ज. व वि.जा.भ.ज.संवर्गातील मुलींसाठी ही योजना आहे.
- · इयत्ता 1 वी ते 4 थी साठी उपस्थित दिवसासाठी रू.1/- प्रमाणे भत्ता.
- · कमीतकमी 75% उपस्थिती आवश्यक.
- ·शाळेमार्फत प्रस्ताव पाठविला जातो.
- ·शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्याच्या पालकांना वितरीत केली जाते.
·