mukhprushth

Digital शाळा



डिजिटल शाळा  : आजकाल शाळांचे पारंपारिक स्वरूप बदलत आहे. पूर्वी खडू, फळा, डस्टर, शैक्षणिक तक्ते, पृथ्वीचा गोल, मातीच्या मण्यांच्या माळा, नकाशे एवढं साहित्य वर्गात असलं की शाळेचा वर्ग सुरळीत चालू राहायचा.

     पण आताचे विद्यार्थी पाढे दृक्श्राव्य चित्रफितीच्या स्वरूपात पाहून म्हणतात. आता विद्यार्थ्यांना धडा शिकविणे ज्ञानरचनावादाकडून उलटा प्रवास केल्यासारखा आहे. विद्यार्थी संगणकावर स्वत:च धडा शिकतात.

      आमच्या शाळेत संगणक व प्रोजेक्टर आहेत. तर भविष्यात संगणक प्रयोगशाळा (computer lab) करण्याचा आमचा मानस आहे. शाळेतील शिक्षक स्वत:च्या लॅपटॉपचा वापर करतात. काहीजण तर अॅण्ड्रॉईड मोबाईल वरील अॅप्स चा चातुर्याने उपयोग करतात.